सिनेट निवडणुकीत युवासेनेचा भगवा झेंडा

सिनेट निवडणुकीत युवासेनेचा भगवा झेंडा

जय नहाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबई विद्यापीठात पुन्हा युवासेनेचा भगवा फडकलाय. सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय झालाय. 10 पैकी 10 म्हणजे सर्व जागांवर युवा सेनेने दणदणीत विजय मिळवलाय. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली युवासेनेचा दणदणीत विजय झालाय. सिनेट निवडणुकीत शिनसेनेच्या युवासेनेने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव केला आहे.

या सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागांवर युवासेनेचे उमेद्वार निवडून आले आहेत. याआधी 2010मध्ये युवासेनेने ही निवडणुक जिंकली होती. यावर्षी युवासेनेला टक्कर देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि एनएसयूआयचे उमेद्वार होते. त्यावर मात करत युवासेनेनं विजय मिळवला आहे.

25 मार्चला झालेल्या या निवडणुकीत 62 हजार पदवीधर मतदारांनी मतदान केले होते. यंदाच्या वर्षी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला होता. या संपूर्ण विजयानंतर युवासेनेत जल्लोष पाहायला मिळतोय. युवासेनेनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सुपडा साफ झालाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version