नाशिकमधील देवळा तालुक्यातील जळीतकांड प्रकरणातील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गोरख बच्छाव असे या पीडित युवकाचे नाव आहे. लोहणेर जळीतकांडातील तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर गावकऱ्यांनी गावात बंद पाळण्याचा घेतला निर्णय घेतला आहे. तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
प्रेम प्रकरणातून प्रेयसीने तुरणाला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात घडला. यामध्ये हा युवक गंभीर भाजला असल्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि अखेर रविवारी उपचारादरम्यान या युवकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून पोलिसांनी संबंधित मुलीसह पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
देवळा तालुक्यातील गोरख काशिनाथ बच्छाव याचे एका मुलीशी तीन वर्षांपासून ओळख होती. तर हा युवक या मुलीचे लग्न मोडण्याचा प्रयत्न करत होता. या रागातून मुलीचे आईवडील, दोन भाऊ आणि मुलीने लोहोणेर ग्रामपंचायतसमोर गोरख बच्छाव यास बेदम मारहाण केली. तसेच यावेळी त्या मुलीने मुलाच्या अंगावर इंधन फेकून मुलाला जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणात हा युवक ५५ टक्के भाजला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली होती. तसेच याप्रकरणी पोलिसांनी मुलीसह पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.