सोलापूरमध्ये एका तरूणाचा गणपती विसर्जन करताना दुदैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव हनुमंत गवळी, वय वर्षे 30 आहे. ही घटना 22 सप्टेंबर रोजी रात्री घडली.
सोलापूरातील नान्नज येथील वैभव पाटील यांच्या शेतातील विहिरीत येणाऱ्या बाप्पाचं विसर्जन केले जाते.
गेले 2 दिवस हनुमंत गवळी हे गणपतीचे विसर्जन करत होते.
त्यावेळेस तेथे शिवनेरी तरुण मंडळाचा गणपती विसर्जनासाठी आला होता. या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी मूर्ती खाली उतरवत असताना गवळीचा तोल गेला आणि तो विहिरीत पडला.
खूप वेळ झाला तरी गवळी कुठे दिसेनासा झाला. म्हणून तेथील कार्यकर्त्यांनी पाण्यात उड्या मारल्या आणि गवळीला बाहेर काढले.
त्याच्या डोक्याला दुखापत ही झाली होती.
कार्यकर्त्यांनी त्याला तातडीने एका शासकीय रूग्णालयात घेऊन गेले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिस स्टेशनमध्ये हनुमंत गवळीच्या मृत्यूची नोंद केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.