आबांच्या झाड्यावर लोखंडी पाईपने आंबे काढत असताना पाईमध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने एका ३० वर्षीय तरूणाचा शॉक लागल्याने मृत्यु झाला आहे. हा तरूण सॉफ्टवेअर इंजिनीअर होता युवकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना नाशिक इंदिरा नगर येथील राजसारथी सोसायटीत घडली आहे. अनिरुद्ध धुमाळ असे ३० वर्षीय तरूणाचे नाव आहे.
याबबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अनिरूद्ध धुमाळ हा तरूण आपल्या आजोबांच्या घरी झाडावरील आंबे तोडण्यासाठी शिडीच्या साहाय्याने झाडावर चढला होता, त्याच्या हातात लोखंडी पाईपचा स्पर्श झाडारून गेलेल्या उच्चदाबाच्या बीज वाहीनीला झाल्याने त्यास विजेचा जोरदार धक्का बसला. त्याच धक्क्याने युवक झाडावरून खाली फेकला गेला.
त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याला त्यामुळे तातडीने जिल्हा रूग्नालयात दाखल केले परंतू त्याचा त्याच्या आधीच मृत्यू झाल्याचा डॉक्टरांनी जाहिर केले. दरम्यान तरूणाता शॉक लागून मृत्यू झाला त्यामुळे परिसरात दुखाचं वातवरण पसरलं आहे आणि सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी इंदिरा नगर पोलिसांनी मृत्युची नोंद केली आहे आणि पो नी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुंदर कोकाटे अधिक तपास करत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.