‘आलात तर सोडून जाऊ नका’

‘आलात तर सोडून जाऊ नका’

‘उद्धव गट संकटात आहे. आलात तर सोडून जाऊ नका’. अशी उद्धव गटाची कळकळीची विनंती आहे. पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी भाषणातच तसे बोलून दाखवले आहे. ते शिवसेना भवनात भाजपाचे बंडखोर अद्वय हिरे यांच्या पक्षप्रवेशावेळी, शुक्रवार, २७ जानेवारी २०२३ रोजी उद्धव ठाकरे यांच्यासमोर बोलत होते.
राज्यात शिवसेनेची शकले उडाल्यानंतर सहा महिन्यात पक्षाकडे फारसे कोणी फिरकले नव्हते. त्यातच भाजपाचे बंडखोर अद्वय हिरे यांनी उद्धव गटात प्रवेश केला. त्यामुळे संजय राऊत यांना हुरूप आला असला तरी संघटनेची सद्यस्थिती ओळखून राऊतांच्या भाषणातून चिंता व्यक्त झालीच.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version