ठाण्याच्या येऊरला थर्टी फस्टच्या पार्टीचा बेत आखणाऱ्यांनो सावधान!

ठाण्याच्या येऊरला थर्टी फस्टच्या पार्टीचा बेत आखणाऱ्यांनो सावधान!

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

ठाण्याच्या येऊरला नववर्ष स्वागताचे निमित्त साधत हजारो पर्यटक 31 डिसेंबरला दरवर्षी  भेट देतात.

आनंद, जल्लोष साजरा करण्याच्या नावाखाली याठिकाणी दारु पिऊन धिंगाणा घालण्याचे प्रकार अनेकदा घडतात. त्यामुळे ठाण्यातील निसर्गरम्य येऊरमध्ये यंदा प्रथमच 16 डिसेंबरपासून वर्तकनगर पोलिसांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 68 अन्वये नोटीसा बजावुन अवैध पद्धतीने मदयविक्री आणि डीजे पार्ट्यांवर बंदी घातली आहे.

येऊर परिसरातील 75 हॉटेल्स,बंगले आणि रिसॉर्टसना नोटिसा पाठवण्याचे काम सुरू करुन परिसरात गस्त वाढवली असून कारवाई सुरु केलीय.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version