रेल्वे फलाटावर हे काय सांगतोय यमराज

रेल्वे फलाटावर हे काय सांगतोय यमराज

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईच्या लोकल ट्रेनमधून पडून किंवा रुळ ओलांडताना अनेक जणांचा अपघात होतो.कांहीना जीव देखील गमवावा लागतो. हे अपघात थांबवण्यासाठी रेल्वे जनजागृती करते. मात्र, प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात. कुर्ला स्थानक हे प्रवाशांनी गजबजलेलं स्थानक आहे. याठिकाणी रोज अपघाताच्या घटना घडत असतात. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलच्या वतीने अनोख्या पद्धतीने याठिकाणी जनजागृती करण्यात आलीय.

रेल्वे सुरक्षा रक्षकांनी साक्षात यमराजचा वेष परिधान करून प्रवाशांना रेल्वे रूळ पार न करण्याचे आवाहन केले. मात्र, तरीदेखील ज्या प्रवाशांनी रेल्वे रुळ पार केले त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्याकडून पुन्हा रुळ पार न करण्याची शपथ घेतली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version