Social Media Law: भारत सरकारच्या एका पत्रानं ‘X’ हादरलं, आता ‘या’ नियमाचे पालन करणे अनिवार्य

सरकारच्या या कठोर भूमिकेनंतर अखेर X व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेतली आहे.
Social Media Law: भारत सरकारच्या एका पत्रानं ‘X’ हादरलं, आता ‘या’ नियमाचे पालन करणे अनिवार्य

नवी दिल्ली: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X यांनी अखेर भारत सरकारसमोर माघार घेत भारतीय कायद्यांचे पालन करण्याची तयारी दर्शवली आहे. कंपनीने आपली चूक मान्य करत अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेंटवर कारवाई सुरू केली असून, आतापर्यंत सुमारे 3,500 कंटेंट ब्लॉक करण्यात आले आहेत, तर 600 पेक्षा जास्त अकाउंट्स डिलीट करण्यात आले आहेत. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, आता X प्लॅटफॉर्मवर अश्लील फोटो आणि तत्सम मजकूर पोस्ट करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

भारत सरकार आणि X यांच्यातील ही तणावपूर्ण रस्सीखेच गेल्या काही काळापासून सुरू होती. सरकारचा आरोप होता की X आणि त्याचा एआय टूल Grok AI यांचा वापर करून प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात अश्लील, अपमानास्पद आणि आक्षेपार्ह कंटेंट पसरवला जात आहे. विशेषतः महिलांच्या बनावट अकाउंट्सद्वारे अश्लील फोटो आणि व्हिडीओ तयार करून ते सार्वजनिकरित्या शेअर केले जात असल्याबद्दल सरकारने गंभीर चिंता व्यक्त केली होती.

हेही वाचा: Pune Election 2026: पुणे शहरासाठी अजित पवारांनी मांडली विकासाची पंचसुत्री; म्हणाले खड्डेमुक्त रस्ते ते हायटेक रुग्णालये…

या पार्श्वभूमीवर भारत सरकारने X च्या भारतातील ऑपरेशन्स प्रमुखांना अधिकृत पत्र पाठवले होते. या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की Grok AI चा गैरवापर करून फेक अकाउंट्स तयार केली जात आहेत आणि त्यातून महिलांविरोधात अश्लील व भद्द्या स्वरूपाचा मजकूर प्रसारित केला जात आहे. सरकारने हे कृत्य माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 (Information Technology Act, 2000) आणि आयटी नियम 2021 (IT Rules, 2021) यांचे थेट उल्लंघन असल्याचे स्पष्ट केले होते.

सरकारने X ला अश्लील, आक्षेपार्ह आणि अभद्र कंटेंट तयार करणे किंवा शेअर करणे तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले होते. तसेच, भारतीय कायद्यांचे पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. विशेषतः आयटी कायद्याच्या कलम 79 अंतर्गत मिळणारे कायदेशीर संरक्षण काढून घेतले जाईल, असेही सरकारने स्पष्ट केले होते.

सरकारच्या या कठोर भूमिकेनंतर अखेर X व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेतली आहे. कंपनीने आता जाहीर केले आहे की भारतातील कायदे आणि नियमांचे पालन केले जाईल तसेच प्लॅटफॉर्मवरील प्रतिबंधित आणि बेकायदेशीर कंटेंटवर सातत्याने कारवाई केली जाईल. या निर्णयामुळे सोशल मीडियावर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि डिजिटल स्वच्छतेसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

हेही वाचा: BMC Election 2026: शिवतीर्थावर सभा, पण बालेकिल्ल्याला भगदाड; परळचा ढाण्या वाघ ठाकरेंची साथ सोडणार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version