महिलांना मिळणार ९ महिन्यांची प्रसूती रजा?

महिलांना मिळणार ९ महिन्यांची प्रसूती रजा?

गरोदर स्त्रियांसाठी लवकरच एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. महिलांना मिळणाऱ्या प्रसूती रजेचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. सध्या भारतात गरोदर महिलांना ६ महिन्यांची सुट्टी दिली जात होती, आता या सुट्टीचा कालावधी वाढवून ९ महिने केला जाऊ शकतो. गरोदर स्त्रियांना ९ महिन्याची सुट्टी द्यावी असे निर्देश केंद्र सरकारने खासगी आणि सरकारी संस्थांना द्यावेत अशी शिफारस नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी केली आहे.

महिला कर्मचाऱ्यांना किती दिवसांची मातृत्व रजा मिळावी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. सोमवारी याबाबत नवीन शिफारस समोर आली आहे. नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी ही शिफारस केली आहे. पॉल यांनी म्हटले की, खासगी आणि सार्वजनिक विभागांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी मातृत्व रजेचा कालावधी ६ महिन्यांपासून वाढवून तो ९ महिने करण्याचा विचार करावा.

नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटले की, खासगी आणि सार्वजनिक विभागात महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजेचा कालावधी ६ महिन्यांवरुन वाढवून ९ महिने करणे आवश्यक आहे. महिलांना गरोदरपणात स्वत:ची आणि आपल्या बाळाची देखील जास्त काळजी घ्यावी लागते. त्यामुळे प्रसूती रजेचा कालावधी वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version