भायखळा जेल पाहणीनंतर महिला खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

भायखळा जेल पाहणीनंतर महिला खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भायखळा जेलच्या पाहणीनंतर महिला खासदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी ही भेट झाली.

 

जेलमधील परिस्थितीबाबत महिला खासदारांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. त्यानंतर महिला जेलमधील परिस्थिती सुधारेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

महिला कैदी मंजुळा शेट्ये मृत्यूनंतर महिला कैद्यांवर लैंगिक अत्याचार होत असल्याचं समोर आले. याची गंभीर दखल महिला खासदारांनी घेतली आणि गुरुवारी भायखळा

जेलला भेट देऊन, तिथल्या परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version