म्हणून अल्पवयीन मुलीनं स्वत:ला पेटवून घेतले; आदर्श गाव म्हणून पुरस्कार पटकावणाऱ्या गावातील घटना

म्हणून अल्पवयीन मुलीनं स्वत:ला पेटवून घेतले; आदर्श गाव म्हणून पुरस्कार पटकावणाऱ्या गावातील घटना

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापुर 

 

सोलापुरातील अनगर गावात एका अल्पवयीन मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली.

 

महेश जाधव या मुलाकडून या विद्यार्थीनीला सतत छेडछाडीचा सामना करावा लागत होता. अखेर विद्यार्थिनीनं स्वत:ला पेटवून घेत जीवनयात्रा संपवली.

 

सकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

 

अनगर गावाला काही दिवसांपूर्वीच आदर्श गाव म्हणून नुकताच पुरस्कार मिळाला होता. त्याच गावात अशी घटना घडल्यानं सरकार दरबारी आदर्श ठरवलेल्या गावातच

कायद्याचा धाक न राहिल्याचे चित्र दिसून येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version