नाट्यगृहाचे डबके बनतेय ‘सुसाईड पॉईंट’

नाट्यगृहाचे डबके बनतेय ‘सुसाईड पॉईंट’

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये एका महिलेने आपल्या पाच वर्षाच्या मुलाला कमेरेला बांधून डबक्यात उडी मारुन आत्महत्या केली. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे. शोभा वाळिंबे आणि अर्जुन अशी मृतांची नावे आहेत.शोभा गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याकारणानं पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती.

शोभा मागील 2-4 महिन्यांपासून टीबीने त्रस्त होत्या. त्यांच्या पतीने देखील २ वर्षांपूर्वी आजारपणाला कंटाळून फाशी लावून आत्महत्या केली होती. दरम्यान, ज्या डबक्यामध्ये शोभाने मुलासह आत्महत्या केली त्याठिकाणी नाट्यगृहाचे काम सुरु होते. काही कारणास्तव काम बंद पडल्यानं तिथे डबके तयार झाले. डबक्याचा त्रास होत असल्याने नागरिकांनी वारंवार तक्रार करुनही पालिकेने याकडे दुर्लक्ष केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version