जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून पेठरोडवरील सम्राटनगर परिसरात राहणाऱ्या दशरथ ठमकेचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत दशरथ ठमेकेची पत्नी आणि तिच्या प्रियकरानं धारदार शस्त्रानं दशरथची हत्या केली. याप्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पेठरोडवरील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ असलेल्या जलकुंभाजवळील पाण्याच्या टाकीत ठमके याचा मृतदेह आढळून आला.
ठमके हा गेल्या 21 ऑक्टोबरपासून बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या भावाने पंचवटी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. मृत दशरथ ठमकेंची पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांनी ठमके यांची हत्या केल्याचे पोलीस तपासणीदरम्यान समोर आले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.