‘त्या’ व्यवसायासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला दिला चोप

‘त्या’ व्यवसायासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला दिला चोप

जय महारष्ट्र न्यूज, भंडारा

देह व्यवसायाकरिता अल्पवयीन मुलीच अपहरण करणाऱ्या महिलेला गावकऱ्यांनी चोप दिलाय. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यात 10 वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन चंद्रपूर जिल्ह्यात तिला देहव्यवसायासाठी नेण्यात आलं. अल्पवयीन मुलीला प्रसादामध्ये गुंगीचं औषध देऊन आरोपी महिला नुजत बेगमने तिचं सहकाऱ्यांच्या मदतीने अपहरण केलं आणि तिला चंद्रपुरातल्या खंबाडा गावी नेलं. त्याठिकाणी आझाद खान या नराधमानं तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीने आझाद खानच्या तावडीतून आपली सुटका करत पळ काढला. अल्पवयीन मुलगी आपल्या गावी पोहोचताच आरोपी महिलेला गावकऱ्यांच्या मदतीने चोप देण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version