‘त्या’ गावातील नारी शक्तीने अखेर करुन दाखवले

‘त्या’ गावातील नारी शक्तीने अखेर करुन दाखवले

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

 

नांदेडच्या लहान गावात नारी शक्तीने दारू बंदी केली आहे. गावात देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी महिलांनी प्रचंड मतदान करून बदल घडवला आहे.

देशी दारूच्या बंदीसाठी सहा महिन्यांपासून या महिलांचा लढा सुरू होता. दारूमुळे उद्भवणाऱ्या समस्या महिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.

ठराविक वेळेत 1269 इतकं मतदान झालं. 1269 पैकी 1115 मते दारूच्या बंदीवर पडली तर विरोधात असणारी 95 आणि 59 मते बाद ठरली. सहा महिन्यांच्या यशस्वी लढ्यानंतर महिलांना हे यश आले आहे. त्यामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version