नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथे पाणीपुरी दुकानात काम करणाऱ्या कामगाराने आपल्याच मालकाच्या पत्नीला आणि मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालक आणि या कामगारामध्ये वाद झाला होता. या वादाच्या रागातून हत्या केल्याचे समजते आहे. प्रियांका शाहू (25) आणि अंशुल (4) असे मृतांचे नाव असून रवी पटेल असे आरोपीचे नाव आहे.
नागपूरमध्ये प्रियांका शाहू यांच्या पतीचा पाणी पुरीचे दुकान आहे.
रवी पटेल त्यांच्या पाणी पुरीच्या दुकानावर काम करतो.
मालक आणि रवी यांच्यामध्ये वाद झाला होता.
मालकाने रवीला आपल्या घरी काही सामान घेण्यासाठी पाठवले असताना हत्या केल्याचे समजते आहे.
संध्याकाळी दरवाजा उघडा असल्याचे शेजाऱ्यांना समजताच घराकडे धाव घेतली.
त्यावेळी रक्ताच्या थारोेळ्यात प्रियांका आणि चार वर्षांचा चिमुकली अंशुल यांचा मृतदेह आढळला.
पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पतीची चौकशी केल्यावर रवीचे नाव समोर आले.
पोलिसांनी रवीला अटक केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.