संभाजी ब्रिगेडची माघार

संभाजी ब्रिगेडची माघार

संभाजी ब्रिगेडनेचा मविआला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे मविआला दिलासा मिळाला आहे.

कसबा आणि चिंचवड दोन्ही पोटनिवडणुकीतून संभाजी ब्रिगेडने माघार घेतली आहे. संभाजी ब्रिगेडकडून कसबा मतदारसंघातील अविनाश मोहिते आणि चिंचवड येथील प्रवीण कदम यांनी माघार घेतली आहे. सचिन आहिर यांनी पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर केले आहे.

भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधन झाल्यामुळे पुण्यातील कसबा व चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या जागांवर पोटनिवडणूक होत आहे. दरम्यान, संभाजी ब्रिगेडनेही या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. यामुळे महाविकास आघाडीची धाकधूक वाढली होती. पण, अखेरच्या दिवशी संभाजी ब्रिगेडने उमेदवारी माघारी घेतल्याचे जाहीर केल्याने, मविआला दिलासा मिळाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version