जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
ओखी चक्रीवादळामुळे दाटून येणारे मळभ, तुरळक पाऊस या प्रमुख घटकांमुळे मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 24, 20 अंशावर आल आहे. मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांच्या किमान तापमानातही घट झाली आहे. विशेषत: नाशिक, जळगाव, सोलापूरसह पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यांतही किमान तापमानात घट झालेली पाहयला मिळाली.
किमान तापमानात होत असलेली घट, गारे वारे थंडीत भर घालत असून, आता रात्रीसह दिवसाही मुंबईच्या वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गुरुवारी मुंबईचे किमान तापमान 15.2 अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून चालू मोसमातील हे आतापर्यंतचे नीचांकी किमान तापमान आहे. तत्पूर्वी मागील आठवड्यातच मुंबईचे किमान तापमान 15.8 अंश नोंदविण्यात आले होते.
यात अवघ्या पॉइंट सहाने घट झाली आहे. मात्र, तरीही किमान तापमानात होत असलेल्या घसरणीमुळे मुंबई चांगलीच गारठली असून, मुंबईकरांना हुडहुडी भरली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.