कतरीना आई होणार ?

कतरीना आई होणार ?

बॉलीवूड अभिनेत्री कतरीना कैफ २०२१ साली लग्न बंधनात अडकली त्यानंतर बऱ्याच वेळा ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशाच चर्चा पुन्हा एकदा रंगताना दिसत आहेत. शनिवारी अभिनेत्री कतरीना कैफ हिने सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा यांच्या ईद पार्टीमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.


ईद पार्टीत कतरिनाने सैलसर असा ऑफव्हाइट रंगाचा सूट परिधान केला होता. यात ओढणी आणि हाताने बेबी बम्प लपवण्याचा प्रयत्न करत आहे. असं नेटकऱ्यांचा समज झालाय. या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज बांधला आहे. या वेळी तिने सर्वांना ‘ईद मुबारक’ म्हणत सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

अभिनेता आयुष्य शर्मा आणि सलमान खान ची बहीण अर्पिता ह्यांच्या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यात आमिर खान, कार्तिक आर्यन, प्रीती झिंटा, सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बाल, एमएस धोनीची पत्नी साक्षी, मुलगी झिवा, शहनाज गिल, मनीष पॉल, हुमा कुरेशी असे अनेक स्टार्स दिसले

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version