पुण्यात येऊनही मोदी का खंतावले?

पुण्यात येऊनही मोदी का खंतावले?

पुणे ०१ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंगळवारचा पुणे दौरा कमालीचा चर्चेत राहिला, या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ताई गटाचे नेते शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. पवार आणि मोदी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या वितरण प्रसंगी एकाच व्यासपीठावर आले होते. या कार्यक्रमानंतर पंतप्रधानांनी पुण्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजनही केले. हा सोहळा पोलीस मुख्यालय शिवाजी नगर येथे पार पडला. इथे एक अनपेक्षित घटना घडली, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि पंतप्रधान मोदी यांचा संवाद घडला.

उद्धव ठाकरेंचं नेतृत्व झिडकारून डॉ. गोऱ्हे नुकत्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधला असता यात पंतप्रधानांनी मनातली खंत बोलून दाखवली. त्यामुळे या दोघांमधला संवाद लक्षवेधी ठरला आहे. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गंत घरे मिळवण्यात महिलांची संख्या लक्षणीय असल्याचे सांगितले. त्याला मोदींनी स्मितहस्य करत प्रतिसाद दिला. तसेच, आपल्या मनातील एक खंत नीलम ताईंकडे बोलून दाखवली. मोदी त्यांना म्हणाले, या दौऱ्यात मला पुण्याची बाकरवाडी मिळाली नाही, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version