विमानतळावरून का परतली आलिया ?

विमानतळावरून का परतली आलिया ?

मुंबई, २९मे २०२३, प्रतिनिधी : बॉलीवुड अभिनेत्री आलिया भट्ट ही नेहमीच चर्चेत असते. आता आलिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आलियाचे आजोबा म्हणजेच सोनी राजदान यांचे वडील नरेंद्र राजदान यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे आलियाने आपली सर्व कामे रद्द करून रुग्णालयात धाव घेतली आहे.

अभिनेत्री आलिया भट आयफा २०२३ या पुरस्कार सोहळ्यासाठी दुबईला जायला निघाली होती. परंतु विमानतळावर पोहोचल्यानंतर तिला तिच्या आजोबांची तब्येत खालावल्याचे समजल्यानंतर तिने तात्काळ रुग्णालयात धाव घेतली.

आलिया भट्टचे आजोबा नरेंद्र राजदान यांना मुंबईतील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना यापूर्वीही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आता प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version