अध्यक्षपद कोणाकडे जाणार? ही नावे चर्चेत

अध्यक्षपद कोणाकडे जाणार? ही नावे चर्चेत

मुंबई, 2 मे २०२३, प्रतिनिधी : शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ भाग-2 या आत्मचरित्र पुस्तकाच्या मुंबईतील प्रकाशन सोहळादरम्यान मोठी घोषणा केली आहे. यापुढे पवार कोणतीही निवडणूक लढवणार नाही, तसेच पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. परंतु, शरद पवार यांच्या या घोषणेनंतर आता राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष कोण? यावर आता चर्चा रंगत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आणि आता नव्या अध्यक्षाची चर्चा सुरु झालीये.

शरद पवार हे भारताच्या राजकारणातील दिग्गज नेते आहेत. पण आता त्यांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादीची धुरा कोणत्या नेत्याकडे जाणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर, अध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. यामध्ये प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे या कार्यकर्त्यांची नावे समोर येत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version