राज्यात अनेक ठिकाणी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद येथे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी जमली मात्र, पोलीस काय करत होते? असा सवाल उपस्थित झाला आहे.
राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे कोणाचे नेतृत्त्व आहे? तसेच या विद्यार्थ्यांना कोण भडकवतेय? असा सवालही उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे पोलीस महासंचालकांकडून विचारणा सुरू झाली असून गुप्तचर यंत्रणेच्या अपयशावर पोलिसदलात चर्चेला उधाण आले आहे.
ऑनलाईन परीक्षेच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे कोरोना नियमांचा फज्जा उडाला असून राज्य सरकार या दबावाला बळी पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे घेण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा न घेता ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आज राज्यभरात आंदोलन केले आहे. तसेच शाळेने अभ्यासक्रम पूर्ण केला असून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्य़ांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा आणि त्यासाठी परीक्षा पुढे ढकलवी, अशी मागमी विद्यार्थ्यांनी केली आहे.
ऑफलाईन परीक्षा रद्द करून ऑनलाईन घेण्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यामुळे आज धारावीयेथील शिक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. तसेच राज्यात ठिकठिकाणी ऑफलाईन परीक्षेविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. नागपूरसह काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.