कोण नरेश म्हस्के ? – अजित पवार

कोण नरेश म्हस्के ? – अजित पवार

शिवसेना प्रवक्ता नरेश म्हस्के यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत. क्रिकेट असोसिएशन निवडणुकीमध्ये रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला असा गौप्यस्फोट नरेश म्हस्के यांनी केला. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दरम्यान, म्हस्के यांनी केलेल्या आरोपांना अजित पवारांनी प्रत्युत्त्तर दिले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना नरेश म्हस्के यांच्या आरोपांवर प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, कोण आहे नरेश म्हस्के, मी त्यांना ओळखत नाही. त्यामुळे असल्या आलतू-फालतू बोलणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही. आम्ही घरामध्ये अशा पद्धतीने वागत नाहीत. रोहित माझ्या मुलासारखा आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

नरेश म्हस्के यांनी काय आरोप केला?

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांना पराभूत करण्यासाठी अजित पवारांनी प्रयत्न केले असल्याचा गौप्यस्फोट नरेश म्हस्के यांनी केला आहे. तसेच, रोहित यांना निवडणुकीत पाडण्यासाठी अजित पवारांनी सर्वांना फोन केले असल्याचा दावाही म्हस्के यांनी केला आहे. म्हस्के म्हणाले, अजित पवार साहेब आधी आपलं बघा, नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करा. रोहित पवारांना पाडण्यासाठी तुम्ही कोणाकोणाला फोन केले आणि निरोप दिले ते सांगा. आधी याची कल्पना द्या, नंतर आमच्यावर टीका करा, असे ते म्हणाले.

जानेवारीमध्ये क्रिकेट असोसिएशनची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी रोहित पवार आणि अभिषेक बोके हे रिंगणात उतरले होते. दरम्यान, रोहित पवार यांची सदस्य म्हणून निवड झाली. याआधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ सदस्याच्या कमिटीमध्ये रोहित पवारांची निवड झाली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version