ड्रेसवाली नेमकी कोण?

ड्रेसवाली नेमकी कोण?

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदर मनामध्ये भरली’ ही मालिका प्रेक्षकांची मने जिंकत आहे, यातील प्रत्येक पात्र खूप गाजले. या मालिकेतील नंदिनी या पात्राने उत्तम मैत्रीण म्हणून आपली छाप सोडली. हे पात्र साकारले होते अभिनेत्र अदिती द्रविडने. काही महिन्यांपूर्वी अदितीने मालिकेचा निरोप घेतला त्यानंतर आदिती पुढे काय करणार याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता होती. तर आता तिच्या चाहत्यांची उत्सुकता संपली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींच्या स्टोरीमध्ये द ड्रेसवाली हे प्रोफाइल पाहायला मिळत होते.काहींनी आपल्या चॅटचा स्क्रीन शॉट शेअर केले होते. यात त्यांना ‘द ड्रेसवाली डॉट को’ या प्रोफाईल वरून मेसेज आलेले दिसत होते. त्या अकाउंटवरून त्यांना, हाय मी द ड्रेसवाली, माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी खास आहे.तर तुम्ही मला २२ एप्रिलला भेटाल का? असे मेसेज आलेले दिसले. यावर बऱ्याच सेलिब्रिटींनी तुम्ही कोण असा प्रश्न करत तो स्क्रीन शॉट सोशल मीडियावर शेअर केला.

कलाविश्वातील पियुष कुलकर्णी, ज्ञानदा रामतीर्थकर, सुयश टिळक, समीर परांजपे, सावनी रविंद्र, आदिश वैद्य, पूर्वा गोरे यांसारख्या अनेक कलाकारांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर ‘द ड्रेसवाली डॉट को’ या पेजसोबतच्या चॅटचा स्क्रीन शॉट शेअर केला होता. यामागील रहस्य अखेर आज उलगडलं आहे. आज अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अभिनेत्री अदितीने आपल्या नव्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. यामध्ये तिने आपला स्वतःचा डिझायनर कपड्यांचा ब्रँड लाँच केलाय. एक खास पोस्ट शेअर करत या संदर्भात माहिती दिली. त्यात तिने लिहिले,’ हो तुमच्यापैकी जवळपास प्रत्येकाने तिचा बरोबर अंदाज लावला होता! आमची ड्रेसवाली दुसरी कोणी नसून अदिती विनायक द्रविड आहे. जवळपास ३ वर्षे यावर काम केल्यानंतर आम्ही शेवटी ‘अक्षय्य तृतीया’च्या या शुभ दिवशी आमचा कपड्यांचा ब्रँड लॉन्च करत आहोत. आधीच आमच्यावर शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! . यामुळे आता अदितीचे चाहते खूप खुश झाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version