मुंबई, ७ मे २०२३, प्रतिनिधी : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली हा नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच विराट आणि गौतम गंभीर यांच्या वाद बराच गाजला होता. आता आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या बालमित्राच्या आईने विराटबद्दल काही खुलासे केले आहेत
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या आय पी एल संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अलीकडेच एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत विराटच्या मित्राची आई आणि बालपणीच्या प्रशिक्षक यांच्यातील संभाषण दिसत आहे.यावेळी विराटला लहानपणापासूनच अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची इच्छा होती, असं त्याच्या मित्राच्या आईने सांगितलं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सामायिक केलेल्या व्हिडीओत विराटचे पहिले प्रशिक्षक राजकुमार शर्मा , बालपणीचा मित्र शलज आणि त्याची आई यांच्याशी झालेला संवाद आहे.यावेळी त्याच्या बालमित्राच्या आई ने सांगितले की,” माझा मुलगा आणि विराट राजकुमार शर्मा यांच्या क्रिकेट अकादमीत क्रिकेट शिकण्यासाठी जायचे. एकदा मदन क्रिकेट अकादमीमध्ये मॅच सुरू होती. तिथे जाहिरातीचे पोस्टर चिकटवले होते. ते पोस्टर पाहून विराट म्हणाला होता की, ”एक दिवस मी मोठा होईन आणि सिनेअभिनेत्रीसोबत लग्न करेन.” हे ऐकून विराटचे चाहते खुश झाले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.