जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचं फेब्रुवारी-मार्च 2018 मधील वेळापत्रक जाहीर झालंय. दहावीची परीक्षा 1 मार्च 2018 ते 24 मार्च 2018 दरम्यान, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2018 ते 20 मार्च 2018 दरम्यान होणारंय.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने वेळापत्रक जाहीर केल्या आहेत.
परीक्षेचं वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं असलं, तरी छापील स्वरुपात प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पाठवण्यात येणारंय.
दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळाव्यतिरिक्त इतर संकेतस्थळ अथवा व्हॉट्सअॅपवरुन फॉरवर्ड होणाऱ्या वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये, असंही शिक्षण मंडळानं स्पष्ट केलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.