आता व्हॉट्सअॅपवर करता येणार पैसे ट्रान्सफर

आता व्हॉट्सअॅपवर करता येणार पैसे ट्रान्सफर

वृत्तसंस्था, मुंबई

 

भारतात व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अॅपपैकी एक आहे.

 

व्हॉट्सअॅपने नेहमीच नवीनवीन फिचर्स आणलेत. आता व्हॉट्सअॅप आणखी एक फिचर आणण्याच्या तयारीत आहे.

 

या फिचरव्दारे आपल्याला एकमेकांना पैसे ट्रान्सफर करता येणं शक्य होणार आहे.

 

या वर्षांअखेरपर्यंत व्हॉट्सअॅपवर ही सुविधा उपलब्ध होणार असून यूपीआय म्हणजेच ‘यूनिफाईड पेमेंट इंटरफेस’ सेवा ग्राहकांना वापरता येणार आहे. 

 

यासाठी व्हॉट्सअॅपची यंत्रणा काही बँका आणि एनपीसीआय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी यूपीआय सपोर्टसाठी चर्चा करते. 

 

यातील तांत्रिक गोष्टी सुरळीत झाल्या की ही सेवा व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version