एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं?

एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं?

शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकरला आहे. शिवसेना तसेच अपक्ष आमदार मिळून ५० आमदारांनी बंड पुकारला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आहेत. तर, शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं असल्याची माहिती समोर आली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे गटाचं ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असं नाव ठेवण्यात आलं आहे. शनिवारी सायंकाळी शिंदे गटाच्या नावाबद्दल अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेनेकडून शिंदे गटाच्या नावाला विरोध दर्शवण्यात येत आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांनी आणि शिवसैनिकांनी शिंदे गटाला बाळासाहेबांचं नाव वापरण्याचा अधिकार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाने शिवसेना- बाळासाहेब ठाकरे हे नाव स्वार्थासाठी घेतले आहे. तसेच बंडखोर आमदारांना हे सर्व बाळासाहेबांनीच मिळवून दिली आहे. तरीही अशाप्रकारे शिवसेना पक्षासोबत गद्दारी बंडखोर आमदारांनी केली आहे. त्यामुळे त्यांना बाळासाहेब यांचं नाव वापरण्याचा अधिकार नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version