रशिया-युक्रेन युद्धात नवव्या दिवशी काय घडले?

रशिया-युक्रेन युद्धात नवव्या दिवशी काय घडले?

रशिया-युक्रेन युद्धाचा आज दहावा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धाचा तीढा कायम असून रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरूच आहे. मात्र, अशातच रशियाकडून युक्रेनमध्ये काही काळासाठी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी  रशियाकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार ११.३० वाजल्यापासून युद्धविराम करण्यात आला. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मात्र, युद्धाच्या नवव्या दिवशी रशियाने युक्रेनवर तीव्र लढाई केली. रशियाडून युक्रेनच्या अणुप्रकल्पावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये प्रकल्पाला भीषण आग लागली. तसेच युक्रेनमधील गोळीबारात भरातीय विद्यार्थी जखमी झाला. त्याला त्वरीत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रशिया-युक्रेन युद्धात नवव्या दिवशी काय घडले?

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की युक्रेन सोडले?


झलेन्स्की यांनी पुतीन यांना चर्चेचं खुलं आवाहन दिलंय.


रशियाकडून झेलेन्स्की यांना ठार मारण्याचे तिनदा प्रयत्न – युक्रेनचा दावा


रशियन सैन्याच्या ताब्यात झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्प.


१२ लाख युक्रेनियन लोकांनी देश सोडला.


यूएनएससीची युद्धाच्या नवव्या दिवशी तातडीची बैठक.


युक्रेनवरील हल्ल्याच्या चौकशीसाठी स्वतंत्र आयोग.


युएनएचआरसीमध्ये मतदानात भारत अनुपस्थित.


युक्रेनने रशियन एसयू-२५ पाडले.


युक्रेनचे २२७ नागरिक ठार, तर ५२५ नागरिक जखमी.


संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाची माहिती.


जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version