मध्य रेल्वे घेणार ड्रोनचा आधार

मध्य रेल्वे घेणार ड्रोनचा आधार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

यंदाच्या पावसाळ्यात रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी मध्य रेल्वे ड्रोनच्या सहाय्याचा आधार घेणार आहेत. मुंबई ते पुण्यापर्यंत रेल्वेमार्गांची पाहणी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय. ड्रोनच्या पाहणीतून आलेल्या अहवालाच्या आधारे आवश्यक उपाययोजना करणे शक्य होणार आहे. यासाठी लवकरच निविदा मागवण्यात येणार असून त्यासाठी पोलिसांकडेही परवानगी मागितली जाणार आहे.

मध्य रेल्वेवरील अनेक भाग सखल असून दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून सेवा विस्कळी होते. त्यासाठी वेगवेगळे उपाय योजले जात असतानाही काही वेळा अडचणी येतात. त्यामुळे हा भाग लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं ड्रोनचा आधार घेण्याचा निर्णय घेतलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version