‘कृष्णा’ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली

‘कृष्णा’ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली

कराड: पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण आणि सहकाराचा केंद्रबिंदू असलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांच्या गटाने पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश मिळवले आहे.ही निवडणूक जरी एका कारखान्याची असली तरी यानिमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील भाजप विरुद्ध काँग्रेस आघाडी असा छुपा संघर्ष होता. त्यामध्ये भाजपने बाजी मारली आहे.

मागील पाच वर्षात पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये कराडमधील कृष्णा समूहाच्या डॉ. सुरेश भोसले आणि त्यांचे पुत्र डॉ. अतुल भोसले यांचाही समावेश आहे. या नेत्यांच्या निमित्ताने भाजपने सहकारात प्रवेश केला होता. या पक्ष बदलाच्या पार्श्वभूमीवर कृष्णा कारखान्याच्या झालेल्या निवडणुकीला भाजपविरुद्ध दोन्ही काँग्रेस असे स्वरूप प्राप्त झाले होते. सत्तारूढ डॉ. सुरेश भोसले यांच्या पॅनेलविरुद्ध दोन्ही काँग्रेसचा पाठिंबा असलेली दोन स्वतंत्र पॅनेल निवडणूक रिंगणात उतरली होती. यामध्ये भाजपने बाजी मारत सहकारातील आपले स्थान कायम राखले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version