Weather Update : पावसाचा जोर मंदावला! महाराष्ट्रात 2 जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार? मुंबईसह कोकणात IMD चा चिंताजनक अंदाज

अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र मुंबईसह उपनगरात आणि कोकणात मात्र काही अंशी पाऊस विश्रांती घेतली आहे.
Weather Update : पावसाचा जोर मंदावला! महाराष्ट्रात 2 जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार? मुंबईसह कोकणात IMD चा चिंताजनक अंदाज

अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र मुंबईसह उपनगरात आणि कोकणात मात्र काही अंशी पाऊस विश्रांती घेतली आहे. दमट उष्ण हवा अरबी समुद्रातून उत्तरेकडे पुढे सरकत असल्यामुळे अति मुसळधार पावसाचा इशारा उत्तरेकडे देण्यात आला आहे. 

1 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला. तसेच हवामान विभागाने पुढील काही दिवस नागपूर आणि परिसरात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच 9 ते 16 जुलै या कालावधीत उत्तर कोकणात पावसाचा जोर अधिक असण्याचीही शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्यासाठी 2 जुलैची वाट पाहायला लागेल.

हेही वाचा- Mumbai Local Train Updates : आता एका क्लिकवर होणार रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क; महिला प्रवाशांसाठी मध्य रेल्वेकडून SOS सेवेत  
पुढील काही दिवस मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, जळगाव, नंदुरबार, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, अमरावती, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून मुसळधार पाऊस राहणार आहे. यावेळी विदर्भ-मराठवाड्यात आज मुसळधार पाऊस पडणार आहे. 

तर उत्तर महाराष्ट्रात पुढचे 48 तास पावसाचा जोर कमी राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होईल. 40 ते 50 किमी ताशी वेगानं वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे. मान्सून संथ गतीनं गुजराकडे सरकला आहे. मात्र तिथे फारसा पाऊस झालेला नाही. महाराष्ट्रातही मागच्या 24 तासांत ऊन पाऊस असा खेळ सुरू झाला आहे. पावसामुळे काही प्रमाणात तापमानात घट झाली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version