Weather Update : नवतपा सुरु होताच राज्यात दुहेरी संकट! विदर्भातील 9 आणि इतर 17 जिल्ह्यांना धोक्याचा अलर्ट; हवामान अपडेट काय?

महाराष्ट्रात पूर्व मान्सून सक्रिय झाला असला तरी सोमवारपासून सुरू झालेल्या नवतपाने विदर्भासह मराठवाड्यात आग पेटवली आहे.
Weather Update : नवतपा सुरु होताच राज्यात दुहेरी संकट! विदर्भातील 9 आणि इतर 17 जिल्ह्यांना धोक्याचा अलर्ट; हवामान अपडेट काय?

महाराष्ट्रात पूर्व मान्सून सक्रिय झाला असला तरी सोमवारपासून सुरू झालेल्या नवतपाने विदर्भासह मराठवाड्यात आग पेटवली आहे. विदर्भ, मराठवाड्यात अक्षरशः आग ओकणारा उकाडा जाणवत आहे. तर कोकण आणि पश्चिम- उत्तर महाराष्ट्रात दमट वातावरणासह पावसाची शक्यता आहे. आज 17 जिल्ह्यांना वादळी पावसाचा तर विदर्भातील 9 जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट देण्यात आला आहे. 

यावेळी कोकणात मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात सांगली, सातारा, सोलापूर कोल्हापूर आणि आणि पुणेकरांना अखेर उकाड्यातून दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र आज दुपारनंतर पुणे शहरातील अनेक भागांत प्री-मान्सूनच्या हलक्या सरी बरसल्या आणि वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर या ठिकाणी ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहणार असून विजांसह पावसाची शक्यता आहे. 

हेही वाचा- Monsoon Update : प्रतीक्षा वाढली! हवामान विभागाची चिंता वाढवणारी माहिती; चक्रीवादळाचं नवं संकट घोंघावतयं, वाचा कधी पडणार पाऊस

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात सोमवारी पूर्व मौसमी सरींनी हजेरी लावल्यानंतर आज आणि उद्या ही सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. पावसासंदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून येणाऱ्या दोन दिवसात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या नुसार आज आणि उद्या मेघगर्जना विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस आणि उद्या 39 अंश सेल्सिअस पर्यंत राहील त्यानंतर शुक्रवारी, शनिवारी आकाश निरभ्र राहील. दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे

विदर्भात 28 मे पर्यंत तीव्र उष्ण लाटेचा हवामान विभागाने इशारा दिला आहे. यावेळी नागपूर,भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अकोला जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. नागपूरसह सहा जिल्ह्यांचे तापमान 46 अंशाच्या पुढे गेल्याने विदर्भाची भट्टी झाली असून तीव्र उष्ण लाटांनी लोकांचे अंग अक्षरशः भाजून निघत आहे. सलग चार दिवसांपासून 47 अंशाच्या पुढे असलेल्या ब्रह्मपुरीचा पारा आज 47.6 अंशांवर गेला असून नागपूर 46.5, गडचिरोली 46.4, भंडारा 46.4, गोंदिया 46.1, चंद्रपूर 46, वर्धा 46, अकोला 45.4 आणि अमरावतीतील तापमान 45 अंश सेल्सिअसवर गेले आहे. यात ब्रह्मपुरी देशात सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. विदर्भातील 11 पैकी 9 जिल्ह्यातील नागरिकांना उष्ण लाटेचा सामना करीत असून उन्हाचा पारा 45 अंशाच्या पुढे आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version