Weather Update: पुढील दोन दिवस उत्तर, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचे थैमान; IMD कडून अलर्ट जारी

ऐन उन्हाळ्यात ढगाळ वातावरण असल्याने मुंबई आणि संपूर्ण राज्यभरात आज पुन्हा मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
Weather Update: पुढील दोन दिवस उत्तर, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचे थैमान; IMD कडून अलर्ट जारी

ऐन उन्हाळ्यात ढगाळ वातावरण असल्याने मुंबई आणि संपूर्ण राज्यभरात वातावरणात होणारे सततचे बदल यामुळे शेतकऱ्यांच्या पिकासह नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. आज पुन्हा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी उन्हाचे चटके बसण्याची शक्यता आहे.

आज कोकणात रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर सिंधुदुर्गात सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ तालुक्यातील ग्रामीण परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस कोसळणार असल्याची शक्यता आहे. यावेळी कोकणात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे नाचणी पिकांसह आंबा, काजू व कोकम पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- Weather Update : रात्री जोरदार पावसाची हजेरी होणार…; राज्यातील 9 जिल्ह्यांना हवामान खात्याचा अंदाज

मध्य महाराष्ट्रात जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली तसेच विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात नागपूरसह विदर्भात हिट व्हेव असतो पण यंदाच्या वर्षात चित्र बदलण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार एप्रिल महिन्यातील काही दिवसात अवकाळी पाऊसाची शक्यता असणार आहे. तर एप्रिल महिन्यात सरासरी 12 टक्के पावसाचा अंदाज असून त्यामुळे अधूनमधून ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी जाणवणार असल्याने 60 ते 70 किमी वाऱ्याचा वेग राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहणार असून नाशिक, धुळे आणि जळगाव या पट्ट्यात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version