मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या मंगळवारी काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अनेक भागांमध्ये मंगळवारी एकतर पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील अथवा पाणी कमी दाबाने येईल.
कारण काय?
बृहन्मुंबई महानगरपालिकेने वांद्रे पश्चिम येथील 900 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
कोणत्या भागांवर अधिक परिणाम?
वांद्रे पश्चिमेकडील हिल रोड, पाली हिल, कार्टर रोड, सेंट अँड्र्यूज मार्ग, पाली गाव, चिंबई, शेर्ली गाव, कांतवाडी तसेच खार दांडा, कोळीवाडा, दांडा पाडा, चुईम गावठाण, खार पश्चिमेतील काही भागात , माउंट मेरी परिसर, के.सी. मार्ग, बाजार रस्ता, पाली माला, कोल डोंगरी, नर्गिस दत्त मार्ग पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. हिल रोडच्या टोकापासून ताज लँड्स एन्ड, बी. जे. मार्ग, एच.के. भाभा मार्ग, काणे मार्ग आणि गणेश झोपडपट्टी परिसरात मध्यरात्रीनंतर 1 ते पहाटे 4.30 या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.