18 जानेवारीला मुंबईत कोरडा दिवस

18 जानेवारीला मुंबईत कोरडा दिवस

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

येत्या 18 जानेवारीला मुंबईकरांना कोरडा दिवस अनुभवावा लागणार आहे. मुंबई मनपाअंतर्गत येणाऱ्या माहिम भूमिगत बोगद्याजवळ दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे.

याकारणाने रुपारेल कॉलेज ते रेसकोर्सपर्यंतचा जलबोगदा 12 तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे कुलाबा, काळबादेवी, गिरगाव, भायखळा, दादर, परळ, वांद्रे या भागात 18 जानेवारीला पाणीपुरवठा होणार नाही.

त्यामुळे मुंबईचा काही भाग या दिवशी कोरडा राहणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version