पुण्यात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुण्यात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुणेकरांनो पाणी जपून वापरा. कारण, पुणे महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आठवड्यातून एकदा म्हणजे दर गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. तसेच, ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवण्यासाठी पालिकेने १० टक्के पाणीकपात आणि पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मान्सून लांबण्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पालिकेने पुण्यात पाणीकपात केली आहे. त्यानुसार १८ मेपासून दर आठवड्यातील गुरुवारी संपूर्ण पुण्यात पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. पालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पाणीपुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. तसेच, पाणीकपातीमुळे साधारणपणे ०.२५ टीएमसी पाणी हे तीन महिन्यांत वाचण्यास मदत होईल, असा दावा त्यांनी केला आहे. यंदा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे राज्य शासनाने ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पाणीसाठ्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version