येते चार दिवस ठाणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने पाणी पुरवठा झोनिंग पद्धतीने होणार आहे. ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा करणाऱ्या एका मुख्य अशुद्ध जलवाहिनीची वेगवेगळ्या सहा ठिकाणी गळती काढण्याचे काम २१ ते २४ फेब्रुवारी या काळात होणार आहे. या काळात शहराला स्वत:च्या योजनेतून ५० टक्केच पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे या काळात शहरात झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचा परिणाम म्हणजे प्रत्येक झोनमध्ये या चार दिवसात किमान १२ ते २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.
जलवाहिनीला सहा वेगवेगळ्या ठिकाणी लागलेली गळती बंद करण्याचे काम केले जाणार आहे. या काळात महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून केवळ ५० टक्के पाणीपुरवठा होणार आहे. तसेच साकेत पुलावरील मुख्य जलवाहिनीवर व्हॅक्युम एअरव्हॉल्व्ह बसविणे, इंदिरानगरकडे नव्याने टाकण्यात आलेल्या ११६८ मिमी जलवाहिनीची तीनहात नाका येथे मुख्य जलवाहिनीशी जोडणी करणे, तसेच पाणीपुरवठ्यामधील दैनंदिन देखभाल व दुरुस्तीची अत्यंत आवश्यक कामे २१ ते २४ फेब्रुवारीदरम्यान केली जाणार आहेत. त्यामुळे ठाणे शहरात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
या मुख्य दुरुस्ती सोबतच, साकेत पुलावरील मुख्य जलवाहिनीवर व्हॅक्यूम एअर व्हॉल्व बसविणे, पाणी पुरवठ्यातील दैनंदिन देखभाल दुरुस्तीची अत्यंत आवश्यक कामेही आदी विविध कामेही या चार दिवसात केली जाणार आहेत.या शट डाऊनंतर पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत एक-दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.