मुंबईकरांनो पाणी जपून वापरा..हे असेल पाण्याचं वेळापत्रक

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा..हे असेल पाण्याचं वेळापत्रक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांनी घरातलं पाणी आताच भरुन ठेवावा लागणार आहे. मुंबई शहरात आज सकाळी दहा वाजल्यापासून ते उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत पाणीपुरवठा होणार नाही.

 

शहर विभागात 24 तासांसाठी पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांवर नवीन झडपा बसवण्याचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मरोळ ते महालक्ष्मी रेसकोर्सपर्यंतचा जलबोगदा 24 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

 

तर मुंबई शहरातल्या अनेक भागांत कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version