छत्रपती संभाजीगर : रब्बी हंगामाच्या पिकांसाठी मंगळवारी सायंकाळी जायकवाडीतून १०० क्युसेकने डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे मराठवाड्याच्या तीन जिल्ह्यांतील 1 लाख 41 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली.जायकवाडी धरण यंदा पूर्ण क्षेमतेने भरले आहे. रब्बी पिकांसाठी पाणीपाळीचे नियोजन पंधरा दिवसांपूर्वी करण्यात आले होते.
जायकवाडी धरणाची क्षमता ?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे गोदावरी नदीवर असलेले जायकवाडी धरण आहे. या धरणाला नाथसागर असे देखील संबोधले जाते. जायकवाडी धरणाची क्षमता तब्बल 102 टीएमसी पाणीसाठ्याची आहे. जायकवाडी धरणामुळे मराठवाड्यातील 2.40 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. 60-10 किलोमीटर लांबी रूंदी असलेले हे नाथसागर धरण आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. जायकवाडी धरण एकदा पावसाच्या पाण्याने पूर्ण भरल्यानंतर त्यामधून 2 वर्ष शेतीच्या आणि 4 वर्ष पिण्याच्या पाण्याची सोय होते.
जायकवाडी धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडले. त्यामुळे दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जायकवाडीच्या पाण्यामुळे तीन जिल्ह्यांना फायदा होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.