राज्यात अवकाळी पावसाचा इशारा

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा

राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडण्याची शक्यता आहे. सोमवारी राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १३ ते १६ मार्चदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. तर विदर्भात १४ ते १६ मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पुन्हा गारपिटीसह पावसाचा अंदाज असून यामुळे कापणीला आलेल्या पिकांचा फटका बसण्याची शक्यता आहे.

याआधीही मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे शतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. अशातच पुन्हा एकदा राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाचा फटका बसणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 16 मार्चपर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस पडू शकतो. यातच प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपुर्वी धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला होता. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. आधीच शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version