वारकऱ्यांवर काळाचा घाला, तंबूवर भिंत पडून एकाचा मृत्यू

वारकऱ्यांवर काळाचा घाला, तंबूवर भिंत पडून एकाचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

आषाढी वारीसाठी पंढरपुरात दाखल झालेल्या वारकऱ्यांच्या तंबूवर भिंत पडून एका भाविकाचा मृत्यू झाला. दोन महिला जखमी झाल्या आहेत. कराड रोड जवळील मोकळ्या जागेत भाविक तंबू टाकून विसावले होते. तेव्हा दुपारी तीनच्या सुमारास अचानक भिंत कोसळली.

भिंतीखाली अडकलेल्या भाविकांना तात्काळ बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, परभणी जिल्ह्यातील पिंगळी गावाचे रामकिशन माधव कराळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर जखमी मंजुषाबाई आणि सुमनबाई कुदळे यांना जिंतूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version