भायखळ्यात येऊन तोडफोड करा मग तुम्हाला दाखवतो? वारीस पठाण यांचे राज ठाकरेंना आव्हान

भायखळ्यात येऊन तोडफोड करा मग तुम्हाला दाखवतो? वारीस पठाण यांचे राज ठाकरेंना आव्हान

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अनधिकृत फेरीवाल्यांच्या धुलाईवरून सुरू झालेल्या मनसे आणि काँग्रेसमधील राड्यात आता एमआयएमने उडी घेतलीय. मुंबईतील भायखळ्यात येऊन तोडफोड करा मग तुम्हाला दाखवतो? असे आव्हान एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलंय.

राज ठाकरे म्हणजे “बुझा हुआ दिया’ म्हणत मनसेची ही तोडफोड राजकीय अस्तित्व जपण्यासाठी सुरू असल्याचा आरोपही आमदार पठाण यांनी केलाय.

ईद-ए-मिलाद निमित्त सोलापुरात एमआयएमने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी आमदार पठाण सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील पत्रकार परिषदेत पठाण यांनी हे चॅलेंज दिले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version