पांढरे दात हवेत, हे उपाय करून पहा

पांढरे दात हवेत, हे उपाय करून पहा

आपले हास्य हे आपलं व्यक्तिमत्व दर्शवत असते. अशा वेळी एखाद्याला प्रभावित करण्यात दात महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे दातांची निगा राखणे खूप गरजेचे आहे.जर नियमित दात घासूनही तुमचे दात स्वच्छ नसतील तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.पाहूया काही घरगुती उपाय-

बेकिंग सोडा
बेकिंग सोडा आपल्या दातांमध्ये चमक आणण्यास अतिशय उपयुक्त ठरतो. त्यासाठी अर्धा चमचा बेकिंग सोड्यात चिमूटभर मीठ घाला. यानंतर हे मिश्रण ब्रशमध्ये घेऊन दातांची हलकी मास्ज करा. काही दिवसांनी तुम्हला फरक जाणवेल.

व्हिनेगरची मदत घ्या
आपले दात स्वच्छ करण्यासाठी तसेच तोंडाचा वास दूर करण्यासाठी पांढऱ्या व्हिनेगरचा वापर करू शकता. सकाळी ब्रश केल्यानंतर पांढरा व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात मिसळून गुळणी घ्यावी. असे केल्याने तोंडाच्या दुर्गंधीपासूनही मुक्ती मिळेल.

स्ट्रॉबेरीचा वापर करा
दातांना चमक आणण्यासाठी स्ट्रॉबेरीचा ही वापर होऊ शकतो. त्यासाठी आधी स्ट्रॉबेरी कुस्करून घ्या. मग त्यात चिमूटभर मीठ घालून त्यानं दात स्वच्छ करा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version