वृत्तसंस्था, नवी दिल्ली
आंध्र प्रदेशातील एका अवलियाने चक्क हाताने एका मिनिटात 212 अक्रोड फोडण्याचा विक्रम केलाय. प्रभाकर रेड्डी असे त्या इसमाचे नाव आहे. या विक्रमाचा व्हिडीओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनेच शेअर केलाय.
यापूर्वी रेड्डी यांच्याच नावावर 210 अक्रोड फोडण्याचा विक्रम होता. पाकिस्तानच्या मुहम्मद राशीद यांनी 210 अक्रोड फोडण्याच्या विक्रमाची बरोबरी केली होती. आता परत रेड्डी यांच्याच नावावर नवा विक्रम नोंदला गेला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.