वृत्तसंस्था, गुजरात
गुजरातमध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. यात EVM अर्थात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचं बटण दाबून मतदान केल्यानंतर मतदाराला पुरवा म्हणून एक चिठ्ठी सोबत जोडलेल्या V VPAT मशीनमधुन दिली जाणार आहे.
अशा प्रकारे पूर्ण स्वरुपात V VPAT मशिनचा उपयोग करणारं गुजरात हे पहिलं राज्य ठरणार आहे. गुजरात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि प्रधान सचिव बी.बी. स्वेन यांनी गांधीनगर मध्ये प्रात्याक्षिक देत याची अधिकृत घोषणा केली.
प्रथमत:च गुजरातमधील सगळ्याच 50 हजार 128 केंद्रांमध्ये हे V VPAT मशीनचा वापर केला जाणार आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.