विठ्ठल पाटील मारहाण प्रकरणी 5 दिवसांनंतर पोलिसांचं कारवाईच्या दिशेनं पाऊल

विठ्ठल पाटील मारहाण प्रकरणी 5 दिवसांनंतर पोलिसांचं कारवाईच्या दिशेनं पाऊल

जय महाराष्ट्र न्यूज, अकोला

 

गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे वडील माजी आमदार विठ्ठल पाटील यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. पाच दिवसांनंतर मूर्तीजापूर पोलिसांनी कारवाईच्या दिशेने पहिलं पाऊल उचललं.

माजी आमदार विठ्ठल पाटील यांनी मारहाण केल्याचा प्राचार्य संजय आठवले आणि शिपाई अमोल काळे यांनी आरोप केला होता. या दोघांनाही मूर्तीजापूर पोलिसांनी आज दुपारी चार वाज्याल्यानंतर चौकशीसाठी पाचारण केलं. विशेष म्हणजे पोलिसांनी अद्याप घटनास्थळाचा पंचनामाही केला नाही.

 

पाच दिवसांपूर्वी विठ्ठल पाटील यांनी मूर्तिजापूर इथल्या देशमुख कॉलेजातील कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. तसंच अश्लिल भाषेत शिवीगाळही केली होती. त्याचप्रमाणे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप करणार नाही, असा दावा केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version