अध्यादेश काढल्यानंतरच लालदिवा काढू- नव्या महापौरांचा हट्ट

अध्यादेश काढल्यानंतरच लालदिवा काढू- नव्या महापौरांचा हट्ट

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

येत्या 1 मेपासून राष्ट्रपती, पंतप्रधानांसह देशभरातील मंत्र्यांना गाड्यांवर लाल दिवा लावण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बंदी घातली आहे. पण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतरच आपण गाडीवरील लाल दिवा काढू, असा हट्ट धरल्याने वाद होण्याची चिन्हे आहेत.

 

केंद्रीय कॅबिनेटचा निर्णय सर्वांनीच मान्य करायला हवा, मात्र त्यासाठी राज्य सरकारने तसा अध्यादेश प्रसिद्ध केला पाहिजे. मागे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सगळ्या भाजप खासदारांना त्यांची संपत्ती जाहीर करण्याचे आवाहन केले होते. मात्र किती खासदारांनी संपत्ती जाहीर केली, असा सवाल करत महापौरांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version