माजी महापौर महाडेश्वर यांचं निधन

माजी महापौर महाडेश्वर यांचं निधन

मुंबईचे माजी महापौर आणि उद्धव बाळासाहेब गटाचे नेते विश्वनाथ महाडेश्वर यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ६३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एएनआय वृत्त संस्थेने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पार्थिवावर आज दुपारी बांद्रा येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

विश्वनाथ महाडेश्वर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आहेत. त्यांनी मुंबईचे महापौरपद भूषवले आहे. त्यांनी नागरिक शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. विश्वनाथ महाडेश्वर २००२ मध्ये सर्वप्रथम मुंबई महापालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आले. मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०१९ या काळात विश्वनाथ महाडेश्वर यांची मुंबईच्या महापौरपदी नियुक्ती करण्यात आली.

विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. तसेच ते स्थायी समितीचे सदस्य होते. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला होता. शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांची बंडखोरी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्या होत्या.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version